घर चालवायचं कसं म्हणत, 'ते' बसले आंदोलनाला!
घर चालवायचं कसं म्हणत, 'ते' बसले आंदोलनाला! 
मुंबई

घर चालवायचं कसं म्हणत, 'ते' बसले आंदोलनाला!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वेतन वेळेत मिळत नसल्याने पालिकेच्या चारही रुग्णालयांतील सफाई कामगारांनी गुरुवारी (ता.१६) सकाळी दहा वाजल्यापासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले. त्याचा रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.

ऐरोली, नेरूळ, बेलापूर व वाशी येथे महापालिकेची रुग्णालये आहेत. याठिकाणी कार्यरत असलेल्या ४५० सफाई कामगारांचा ठेका बीव्हीजी या कंपनीकडे देण्यात आला आहे; परंतु नेहमीच कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वेतन वेळेवर मिळत नसल्याने बंड पुकारला आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याचादेखील पगार अजून झाला नसल्याचे कर्मचारी गणेश बासूतकर यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्यांची घरे भाड्याने आहेत. त्यांची भाडे थकले आहे, तर मुलांची शालेय शुल्क बाकी आहे. वृद्ध आई-वडिलांच्या आजारपणासाठी पैशांची नितांत गरज आहे. या कारणामुळे सफाई कामगारांच्या मनात कमालीचा संताप आहे. या काम बंद आंदोलनाला समाज समता कामगार संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन भोईर, उपाध्यक्ष संतोष पाटील व प्रवीण सोनावणे यांनी भेट देत पाठिंबा दिला.

रुग्णसेवेवर परिणाम होणार
कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केल्यामुळे दाखल असलेल्या रुग्णांवर ‘काम बंद’ आंदोलनाचा प्रभाव पडत आहे. बाह्यरुग्ण तपासणी कक्षाच्या बाहेर रुग्णांना सोडण्यासाठी कर्मचारी नसल्याने तिथेही अनेक रुग्णांना त्रास होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

रुग्णालय हे अत्यावश्‍यक सेवेत मोडतात. याबाबत प्रशासन व स्वच्छता कंपनीला अजिबात गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. वेतन मिळत नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होत आहे.
- गजानन भोईर, अध्यक्ष, समाज समता कामगार संघटना, नवी मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

Appi Aamchi Collector: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज केंद्रेची 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Jayant Patil : मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक व महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड; जयंत पाटील

Team India squad T20 WC : सूर्यकुमार, बुमरावर भारताचे भवितव्य! टी-20 वर्ल्ड कपबाबत युवराज सिंगचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT