file photo 
मुंबई

'या' ठिकाणी घेतली जातेय कामगारांची उत्तम काळजी 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील मेट्रो 3 या प्रकल्पस्थळी काम करणाऱ्या एकूण 9750 कामगारांना एमएमआरसीकडून स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. या कामगारांना सामाजिक अंतर म्हणजे काय, त्याचे फायदे काय, स्वच्छता कशी राखावी आदी गोष्टींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे ( एमएमआरसी ) आपल्या 51 ठिकाणी 9750 कामगारांची राहण्याची सोय केली आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागाच्या मुख्य अधिका-यांची बैठक घेतली आणि मजुरांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानुसार  मेट्रो 3 च्या भूमिगत प्रकल्पाची कामे करणाऱ्या कामगारांना , सामाजिक अंतराबाहेरचे धडे या रोगापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी मजुरांना शिकवले जात आहेत.

छावणीतून बाहेर येऊ नये म्हणून तिथे सर्व रेशन किंवा अन्न पुरवले जात आहे. त्याचबरोबर छावणीत रोजच्या मजुरांच्या आरोग्याचीही तपासणी केली जात आहे. तसेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ' मेट्रो 3 भूमिगत प्रकल्प स्थळी गर्दी होऊ नये यासाठी पाच टक्केच कामगार कामे करत आहे . या कामगारांना एमएमआरसीकडून मास्क , सॅनिटायझर , कामगार निवासी भागाची स्वच्छता या सर्व आवश्यक पाऊले उचलली जात आहे. 

 कामगारांच्या आरोग्याची तसेच सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करण्यासाठी नियमितपणे त्यांची तपासणी केली जाते. सर्व अन्न इत्यादींसाठी योग्य व्यवस्थाही करण्यात आली आहे असे एमएमआरसीए अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले  आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT