मुंबई

मुंबई- गोवा महामार्गावरील बंदिस्त उड्डाणपुलांमुळे पेणसह गावांची ओळख धुसर

राजेश कांबळे

मुंबईः  गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामाची स्थिती पाहता आजतागायत पूर्ण झाली नाही. पळस्पे ते इंदापूर पर्यंत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे अनेक गावांमधील संपर्क तुटला आहे. कोकणातील पेण हे गणपतीचे माहेरघर म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या पेण शहराची रामवाडी येथे बांधण्यात आलेल्या बंदिस्त उड्डाणपुलामुळे संपूर्ण ओळखच पुसली आहे. 

पनवेलवरून निघालेल्या वाहनधारकांना तरणखोप उड्डाणपुलावरुन डायरेक्ट गडब येथे उतरावे लागत असल्याने प्रसिध्द असणारे पेण शहर आले आहे की नाही याचीच चुणचुण प्रवाशी वर्गाला भासत आहे. राज्यातील एकमेव मुंबई- गोवा महामार्ग आहे की, गेल्या 12 वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र ते पूर्ण होण्यासाठी अधिक काळावधी लागत आहे. या मार्गावरुन दररोज कोकणात जाणारी हजारों वाहने असून अनेक अवजड वाहनांची सुध्दा ये-जा याच महामार्गावरून होत आहे. मात्र पळस्पे ते अंतोरा फाटा पेण येथील दुहेरी रस्त्यांची स्थिती चांगली झाली असल्यानं पेण ते पनवेलपर्यंत जाण्यासाठी वाहनांना आता पाऊण तास लागतो. त्यामुळे प्रवाशीवर्ग सुखावला आहे. पेण ते इंदापूरपर्यंत महामार्गाचे काम जोरात सुरू असले तरी अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, खडी, रखडलेल्या साइट पट्या तर काही ठिकाणी नुसतेच खोदून ठेवलेले रस्ते यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे 2021 च्या वर्षोत कोकणातील मुंबई - गोवा महामार्गावरील विघ्न दूर होऊन लवकरच महामार्ग खुला होऊदे अशीच भावना आता प्रवाशी वर्गाला लागून राहिली आहे. 

मुंबई- गोवा महामार्गावरील बांधण्यात आलेल्या पेण रामवाडी बंदिस्त उड्डाणपुलांमुळे शहरात येणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पेण रेल्वे स्थानकाजवळ ठेवण्यात आलेल्या पुलाच्या दोन मोकळ्या जागेतून सर्व वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असल्याने त्याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याप्रमाणे पनवेल शहराला लागून असलेल्या ओव्हर ब्रीज सारखा जर पेणचा ओव्हर ब्रीज ठेवण्यात आला असता तर शहरासह ग्रामीण भागातील अनेक तरुणांना या ठिकाणी आपला रोजगार उपलब्ध करता आला असता. तसेच पुलाखाली मोठ्यामोठ्या वाहने पार्किंग करता आली असता की त्यामुळे शहरातील सौंदर्यात आणखी भर पडली असती. मात्र या बांधण्यात आलेल्या बंदिस्त उड्डाणपुलांमुळे पेण शहरासह आजुबाजूच्या गावांची ओळख कायमची पुसली गेली आहे.

मुंबई -गोवा महामार्गावरील पेण रामवाडी येथे बांधण्यात आलेल्या पुलामुळे अनेक त्रुटी जाणवत असून रामवाडी, आनंद नगर येथील रहिवाशांना शहरात येण्यासाठी तिथे सर्कल ठेवणे गरजेचे होते. मात्र त्यांना लांबून युटर्न घ्यावे लागत आहे. तसेच त्यांनी अंतर्गत रस्ते सुद्धा लहान ठेवले आहेत. त्यामुळे याबाबत पेण नगरपालिकेने अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केले आहेत. आता ते पुन्हा पेण शहरातून महामार्गावर जाण्यासाठी मार्ग काढत आहेत. त्यात त्यांनी काही त्रुटी ठेऊ नयेत की जेणेकरून पेण शहरात वाहतूक कोंडी होईल याची दक्षता त्यांनी घ्यावी.
प्रीतम पाटील, नगराध्यक्षा पेण नगरपरिषद

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Closed flyovers Mumbai Goa highway identity Pen village been tarnished

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT