मुंबई

Mumbai Rains Update: मुंबईत ढगफुटीसदृश्य पाऊस! सहा तासांत 200mm बरसला, शाळांना सुट्टी; 4 जणांचा मृत्यू

Mumbai city cloudburst like conditions : अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या, तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, विमान वाहतुकीला देखील याचा फटका बसला.

कार्तिक पुजारी

मुंबई- बुधवारी पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपले आहे. दुपारी पाच वाजताच्या सुमारास पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर आर्थिक राजधानीत राहणाऱ्या लोकांना मनस्तापाचा सामना करावा लागला. फक्त सहा तासांमध्ये मुंबई तब्बल 200mm पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या, तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, विमान वाहतुकीला देखील याचा फटका बसला. कामावरून परत जात असतानाच पावसाने कहर सुरु केल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. घरी जाण्यासाठी अनेकांना आहे तिथे ताटकळत उभे राहावे लागले. खासजी वाहन चाकलांची लोकांची प्रचंड लूट केली.

IITM नुसार, घाटकोपरमध्ये सांयकाळी सहा ते रात्री बारावाजेपर्यंत 207 mm पाऊस पडला. महत्त्वाचं म्हणजे, मुंबई शहरात मान्सून कालावधीत जेवढा पाऊस पडतो त्याचे हे 1/10th इतके होते. कमी कालावधीमध्ये 100 mm पेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला ढगफुटी म्हटलं जातं. पण, आयएमडीने याला तुर्तास ढगफुटी म्हटलेलं नाही. काही भागातच मुसळधार पाऊस पडल्याने तसं जाहीर केलेलं नसावं

चार जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे मुंबईत चार जणांचा जीव गेला आहे. वीज पडून कल्याणच्या वराप गावात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, झेनिथ धबधब्यात पडून एक महिला वाहून गेली. एक महिला अंधेरी पूर्व येथे मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडली आहे.

मुंबईसाठी रेड अलर्ट, शाळांना सुट्टी

आयएमडीने आता मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी खबरदारी म्हणून मुंबई, ठाण्यामधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, जुहू, माहिम, सायन, ऐरोली आणि कुलाबामध्ये 24 तासांत 150 mm पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 5 ते 10 वाजण्याच्या दरम्यान जास्त पाऊस पडला आहे.

मुंबईमध्ये मान्सून कालावधीत 9 टक्के जास्तीचा पाऊस पडला आहे. मुंबईमध्ये 1 जून ते 25 सप्टेंबरपर्यंत सरासरी 2046 पाऊस पडतो, पण, सध्या आतापर्यंत 2221 mm पाऊस पडला आहे. मुंबईतील प्रशासन अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. बचावपथक देखील तयारीत आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT