CM Devendra Fadnavis wife Amruta congratulate on twitter 
मुंबई

अमृता फडणवीस म्हणतात, फडणवीस-अजित पवारांनी करून दाखवलं!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या महाराष्ट्राचे राजकरण ढवळून निघालेले असताना, आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. आज (ता. 23) सकाळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राजकारणात खळबळ उडाली. मात्र, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांना व अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'खूप दिवस महाराष्ट्र ज्या दिवसाची वाट पाहात होता, आज तो दिवस, आला आहे. आज शपथविधी झाला. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले आहे
आणि आता महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर नक्की पुढे जाईल.' अशा शुभेच्छा पत्नी अमृता फडणवीसव यांनी दिल्या आहेत. त्यांनी ट्विटवरूनही
फडणवीस व अजित पवारांना 'तुम्ही करून दाखवलं, शुभेच्छा!' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या.

फडणवीस म्हणाले, की जनादेश आम्हाला महायुती म्हणून मिळाले होते. आम्ही एकमेकांना काय वचन दिले हे पाहण्यापेक्षा जनतेला दिलेले वचन महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत येण्यापेक्षा दुसऱ्यासोबत जाणार असल्याने आम्हाला हा निर्णय घेतला. मी मोदी, अमित शहा यांचे आभार मानतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT