CM eknath Shinde advice to MP shiv sena  esakal
मुंबई

CM Eknath Shinde: इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका; CM शिंदेंच्या खासदारांना सूचना

राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीला राज्यात २३ जागा मिळाल्या तर महायुतीला १७ जागा मिळाल्या.

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. महायुतीतील सर्व पक्ष सतर्क आहेत. यावेळी भाजपला लोकसभे बहुमत मिळालं नाही. त्यामुळे भाजप आता मित्रपक्षांवर अवलंबून आहे.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्या. शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्री पदाच्या संदर्भात देखील या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांच्या सत्तास्थापनेबाबत देखील चर्चा झाली. आज रात्री सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिल्लीला रवाना होणार आहेत.

राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीला राज्यात २३ जागा मिळाल्या तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. काँग्रेस राज्यात ११ जागांसह सर्वात मोठा पक्ष राहीला आहे. ठाकरे गटाला ९ तर शरद पवार गटाला ८ जागा मिळाल्या.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ६, अजित पवार यांना फक्त १ जागा मिळाली. सत्तेसाठी केंद्रात भाजपला बहुमत मिळालं नाही. इंडिया आघाडीने जर घोडेबाजार केला. तर त्यांना देखील सत्ता स्थापनेची संधी आहे. त्यामुळे एनडीएतील सर्व खासदारांना सुचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

देशात H1N1चा फैलाव; नवा स्ट्रेन की जुना विषाणू? ICMRने सांगितलं सत्य, वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Vivo V80 Lite: 10,000 mAh बॅटरीसह MediaTek प्रोसेसर अन् तगडा कॅमेरा; 3 सप्टेंबरला लाँच होतोय Vivoचा 5G स्मार्टफोन!

Marathi News Live Updates : ग्रामसेवकांच्या गैरहजेरीला आता लगाम! बायोमेट्रिकसह GPS हजेरी बंधनकारक, नियम मोडल्यास होणार कारवाई

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप! नेहा पिसाळ राज्य कर निरीक्षकपदी, जिद्दीला मिळाली यशाची पावती..

SCROLL FOR NEXT