CM Shinde 
मुंबई

CM Shinde: शरद पवारांच्या पुस्तकाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना डिवचलं!

मी माझं काम करतो. ते बाळासाहेबांची संस्कृती, शिकवण विसरले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- युद्ध पातळीवर पंचनामे होत आहेत. तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. सर्व अहवाल आल्यानंतर मदत दिली जाईल. नुकसान मोठं झालं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. सर्व पालकमंत्र्यांना पंचनाम्यासंबंधी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. (cm eknath shinde criticize shivsena uddhav thakeray on sharad pawar book)

मी माझं काम करतो. ते बाळासाहेबांची संस्कृती, शिकवण विसरले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे. आमच्यावर टीका करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. खालच्या पातळीची भाषा वापरणं आमच्या संस्कृतीत नाही. जे घरात बसून, फेसबुक लाईव्ह करुन सूचना देत होते त्यांनी मला सांगू नये, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

शरद पवारांच्या पुस्तकाचा उल्लेख

शरद पवारांनी देखील उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आहे. सरकार काम करणारं आहे. मागच्या सरकार सारखं फसवणारं नाही. दोन हेक्टरचे तीन हेक्टर करण्याचा निर्णय घेतलाय. एनडीआरफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं शिंदे म्हणाले.

पीकविमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या सहा हजार मदतीमध्ये आम्ही आणखी सहा हजार देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम आम्ही करणार नाही. मागच्या सरकारचे निर्णय आम्ही पूर्ण केले आहेत. सर्व प्रकारची मदत सरकार करेल, असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षण भाष्य

सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही. छगन भुजबळांची जी भूमिका आहे तीच सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार निर्णय घेईल. त्याची जबाबदारी सरकारची असून त्यावर काम सुरु आहे, असं शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT