CM Eknath Shinde 
मुंबई

काही लोकांना बांबू लावायला पाहिजे, सकाळी-सकाळी भोंगा...; एकनाथ शिंदेंची नाव न घेता कोणावर टीका?

CM Eknath Shinde Criticize Thackeray group :एका कार्यक्रमामध्ये ते बांबूंचे महत्व पटवून सांगत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे. काही लोकांना बांबू लावायला पाहिजे, असं शिंदे म्हणाले आहेत. एका कार्यक्रमामध्ये ते बांबूंचे महत्व पटवून सांगत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.

बांबू हे एक महत्त्वाचे वृक्ष आहे. ऑक्सिजन अधिक देणारा आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा म्हणून वृक्षाची ओळख आहे. बांबूचे अनेक बाय प्रोडक्ट आहेत. ज्याची आपल्याला कल्पना देखील नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांबूंची लागवड केली गेली पाहिजे. शिवाय, काही लोकांना बांबू देखील लावायला पाहिजे. काही लोक असे आहेत जे सकाळी-सकाळी भोंगा वाजवतात. एक भोंगा निघालाय तर दुसरा सुरू आहे, असं शिंदे म्हणाले.

संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका करत असतात. शिवाय, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील देत असतात. संजय राऊत यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिलीये. यामुळेच शिंदे यांनी राऊतांवर निशाणा साधला. यावरून संजय राऊत देखील जशासतसे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीचा निकाल ही तात्पुरती गोष्ट आहे. त्यांनी लोकांची दिशाभूल करून मतं मिळवली. पण, विधानसभेमध्ये असे होणार नाही. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे पुन्हा उभे राहतील का? हाच खरा प्रश्न आहे. ते घाबरून दुसरा मतदारसंघ शोधण्याची शक्यता आहे, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT