CM Eknath Shinde group BJP leadership headache by demanding power full post in cabinet mumbai esakal
मुंबई

एकनाथ शिंदे गटाला हवी ‘वजनदार’ खाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता पुन्हा काही ‘वजनदार’ खात्यांची मागणी करून भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढवल्याचे बोलले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुहूर्त लांबणीवर पडला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता पुन्हा काही ‘वजनदार’ खात्यांची मागणी करून भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढवल्याचे बोलले जात आहे.

शिंदे यांनी आता १९ मंत्रिपदाचा प्रस्ताव मांडून ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण खाते हवे असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अशी खाती सोडण्यास भाजप तूर्त तरी तयार नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार अजूनही चर्चेतच राहिला आहे. या वादात दिल्लीतील भाजपचे बडे नेते तोडगा काढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यापासून दोन-चार दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर मात्र, दोन्ही गटातील सत्तावाटप, खाती व त्यावरची चर्चा यामुळे अद्याप मंत्रिमंडळ आकाराला आलेले नाही.

शपथविधीवेळी शिंदे गटाला मुख्यमंत्रिपद दिल्याने त्यांना १३ खाती देण्याचा भाजपचा विचार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु शिंदे गटाने १९ मंत्रिपदांची अपेक्षा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्रिपदानंतर १९ मंत्रिपदे देण्यास भाजप नेत्यांचा नकार आहे. दुसरीकडे शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आपल्या मागणीवर ठाम आहेत. यावरून दोन्ही गटात मतभेद असल्याचे पुढे आले आहे.

मागणीवर ठाम

एकनाथ शिंदे, फडणवीस हे गेल्या आठवड्यात दिल्लीत गेल्याने हा मिटण्याची चिन्हे होती. मात्र, त्यानंतरही शिंदे यांनी ऊर्जा, सावर्जनिक बांधकाम आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्यांची मागणी केली आहे. ती देण्याची भाजप नेत्यांची तयारी नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT