mumbai ekanth shinde in juperitar hospital  sakal
मुंबई

Ulhasnagar Firing: CM एकनाथ शिंदे पोहचले ज्युपिटर रुग्णालयात, आमदार गायकवाड यांच्या गोळीबारात जखमींची घेतली भेट

Chinmay Jagtap

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Ulhasnagar Firing incident MLA Ganpat Gaikwad fired mahesh gaikwad

उल्हासनगरमध्ये काल रात्री राजकीय राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हिल लाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक केबिनमध्येच भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या माजी नगरसेवक यांच्यात राडा झाला. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेत जखमी झालेले शिवसेनेचे महेश गायकवाड यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली. महेश गायकवाड हे व्हेंटिलेटवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT