maratha reservation manoj jarange cm eknath shinde  sakal
मुंबई

Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे आश्वासन… बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

CM Eknath shinde meet maratha Reservation protesters : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

रोहित कणसे

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

काल संध्याकाळी मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झालो होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे आज मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमध्ये बैठक झाली. यावेळी पुण्यातून आलेल्या सात सदस्य मंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

या बैठकीत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवणे यासोबतच मुंबई मंडळ आणि हैदराबाद संस्थानच्या गॅझेटवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृ्त्त दिले आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा आरक्षाबाबत मंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठा आंदोलकांना दिले.

दरम्यान या बैठकीबद्दल शंभूराज देसाई म्हणाले की, "आज मुख्यमंत्र्यांनी सांगितेले की उद्या कॅबिनेट बैठक झाली की, तुम्ही दोघांनी (शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील) मिळून यामध्ये प्रत्येक दिवसाचा फॉलोअप घ्या, कुठेही दफ्तर दिरंगाई व्हायला नको. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितेल की माझ्यावतीने तुम्ही त्या आंदोलनकर्त्यांना विनंती करा की तु्म्ही उपोषण स्थगित करावं, त्यामुळे मनोज जरांगे निश्चीत उपोषण स्थगित करतील असे मला वाटते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT