Eknath shinde. News Sakal
मुंबई

CM Eknath Shinde : रुग्णालयाच्या वार्डचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केईएम रुग्णालयाच्या जवळपास ६ वाॅर्डचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आणि रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पालिकेच्या केईएम रुग्णालयाची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी काही वाॅर्डची पाहणी केली.

जनरल वाॅर्ड, आयसीयू, मध्ये भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. शिवाय, केईएमच्या आयसीयु विभागाचे कौतुक करत नातेवाईक ही उपचारांबद्दल समाधान व्यक्त करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासह बंद असलेले ६ वाॅर्डची पाहणी देखील केली. बंद असलेल्या वाॅर्ड मुळे ४०० ते ४५० रुग्णांचे अ‍ॅडमिशन इथे होत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. युद्धपातळीवर या सहा वाॅर्डचे काम सुरु करुन आठवड्याभरात पुन्हा एकदा पाहणीसाठी येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

तसेच, कोणत्याही रुग्णाला पैसे नसल्यामुळे उपचार नाकारता कामा नये. ज्या रुग्णाला उपचारांसाठी मदत लागेल ती मदत पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल. उच्च दर्जाचे दूध आणि जेवण देऊन कोणत्याही प्रकारची भेसळ करता कामा नये. असे आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल असे ही सांगितले.

राज्य सरकार किंवा पालिका रुग्णालये असोत रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळणे हे महत्त्वाचे आहे. पालिका रुग्णालयांना  लागणाऱ्या गोष्टींसाठी आर्थिक तरतूद कमी पडू देणार नाही असे ही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT