CM Eknath Shinde Sakal
मुंबई

CM Eknath Shinde : आमचीच खरी शिवसेना, आमच्यात फूट नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नोटिशीला उत्तर देताना शिंदे गटाचा विधानसभा अध्यक्षांपुढे दावा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘आमचा पक्ष हाच मूळ शिवसेना असून आमच्या पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही,’’ असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा अध्यक्षांना पाठविलेल्या उत्तरात केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठविलेल्या नोटिशीला शिंदे गटाने उत्तर दिल्याने आमदार अपात्रतेबाबतच्या कारवाईस आता वेग येण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी विरुद्ध गटाकडील आमदारांच्या विरोधात अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे केलेल्या याचिकांची सुनावणी सुरू आहे.

निकालास विलंब शक्य

आमदारांच्या लेखी उत्तराची चाचपणी विधिमंडळ सचिवालय करणार असून त्यानंतरच सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांची उत्तरे लवकरच सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.

मात्र या सर्व उत्तरांचा अभ्यास करणे ही अतिशय वेळखाऊ प्रक्रिया असल्याने निकालास आणखी विलंब लागण्याची शक्यता असल्याचे विधिमंडळातील सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सुयोग्य वेळेत सुनावणी घेऊन निकाल देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वांची बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याने परिच्छेद १० नुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. अध्यक्षांना घाईघाईने निर्णय घेता येणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT