cm eknath shinde says international level sports player will be make from krida sankul Sakal
मुंबई

CM Eknath Shinde : क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : तालुका क्रिडा संकुलाचे काम मागील काही वर्षे रखडले होते. मात्र आज हा प्रकल्प पूर्ण झाला असल्याचा आनंद आहे. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

गुरुवारी कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलाचे लोकपर्ण शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. ठाणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यामतून कोपरी येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले. या क्रीडा संकुलात आता बेडमेंटन देखील सुरू होणार आहे, जिल्ह्यातील खेळाडू मध्ये जिद्द चिकाटी आहे, त्यामुळे येथील सोयी सुविधा या त्यांच्या फायद्याच्या ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात आता नवीन फिटनेस पीडी तयार होत आहे, राज्य शासन देखील खेळाडू साठी नवनवीन सुविधा देत आहे, त्यांच्यासाठी वाढीव निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच खेळातील बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

आपण पालकमंत्री असल्यापासून मी खेळासाठी काम काम करत आहोत, येत्या काळात जिल्हयातुन नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. दादोजी कोंडदेव स्टेडियमची पांढरा हत्ती ही ओळख आता पुसली गेली आहे,

याठिकाणी आता रणजीचे सामने देखील होत आहेत. ठाणे जिल्ह्याला खेळाचा जुना इतिहास आहे आम्ही पूर्वी एकत्र व्यायामाला जात होतो, मात्र आता काळ बदलला आहे, पूर्वी खेळात निवडक संधी होत्या आता अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळं निश्चित ही चांगली बाब असल्याचेही ते म्हणाले.

कधी कोणाला पायचीत करायचे हे आपल्याला ठाऊक - एकनाथ शिंदे

कुठला डाव कधी टाकायचा, कधी कोणाला पायचीत करायचे हे आपल्याला ठाऊक आहे, दीड वर्षा पूर्वी आपण असाच एक कार्यक्रम केला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. त्यामुळे राज्यातील नकारात्मक शक्ती दूर सारून राज्य सकारात्मक दृष्टिने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रँड सेंटर पार्कचे नमो दि सेंट्रल पार्क नामकरण

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या शहरांमध्ये देखील एक नाव त्या उद्यानाला राहील आणि त्या दर्जाचं हे उद्यान आहे. म्हणून ग्रँड सेंट्रल पार्कला आपण नमो सेंट्रल पार्क असे जर नामकरण करावे अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी केली.

त्या मागणीनुसार काही क्षणात नमो दि सेंट्रल पार्क असे नामकरण करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोलशेत येथे कल्पतरू पार्कसिटीमध्ये सुमारे २०.५

एकरवर तयार करण्यात आलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कची संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असून त्याचे गुरूवारी लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन सोहळा पार पडला. तदपूर्वी त्यांनी पार्कची पाहणी केली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अशा प्रकारे ऑक्सिजन पार्क समाजाला आणि काळाची गरज असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT