thane sakal
मुंबई

Thane : CM शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात वाईनला पसंती, पुणे दुसऱ्या क्रमांकावर

ठाणेकरांची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली राज्यातील सहा विभागांतील वाईन विक्रीची सर्वाधिक पसंती मुख्यमंत्र्यांच्या ठाणेकरांनी दिली

प्रशांत कांबळे

मुंबई : सत्तेच्या सारीपाटावर सध्या ठाणेकरांनी वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे ठाणेकरांची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. त्यांच्या आवडी-निवडी सुद्धा फार वेगळ्या असून, ठाणेकरांची खाद्य संस्कृती सुद्धा वेगळीच आहे. त्यातच त्यांची एक वेगळी पसंती सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. राज्यातील सहा विभागांतील वाईन विक्रीची आकडेवारी बघता वाईनला सर्वाधिक पसंती मुख्यमंत्र्यांच्या ठाणेकरांनी दिली आहे.

एकट्या ठाणे विभागात ४२.६५ लाख बल्क लिटर वाईन विक्री गेल्या वर्षभरात झाली आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पुणेकर आहेत. त्‍यांनी सुद्धा वाईन पसंत केली आहे. पुण्यात १९.३ लाख बल्क लिटर वाईन विक्रीची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१७ मध्ये वाईन विक्रीची आकडेवारी बघता त्यावेळी सुद्धा सर्वाधिक वाईन विक्री ठाणे विभागातच झाली होती. त्यानंतर दरवर्षी ठाणेकर आणि पुणेकरांची वाईनला पसंती दिसून आली आहे.

ठाणे विभागात गेल्यावर्षात मुंबई उपनगरात १७.९० लाख बल्क लिटर वाईन विक्री झाली आहे. तर ठाण्यात १०.२० लाख बल्क लिटर विक्रीची नोंद झाली आहे. तर पुणे विभागातून एकट्या पुण्यात १६.४० लाख बल्क लिटर वाईन विक्रीची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत ठाणेकर आणि पुणेकरांची वाईन पसंती वाढताना दिसून येत आहे.

आकडेवारी वर्ष २०२१-२२

ठाणे विभाग (आकडेवारी लाख बल्क लिटर)

  • मुंबई शहर - ५.८८

  • मुंबई उपनगर- १७.९०

  • ठाणे - १०.२०

  • पालघर - ४.२२

  • रायगड - ४.४५

  • एकूण - ४२.६५

  • पुणे विभाग

  • पुणे - १६.४०

  • अहमदनगर - १.६५

  • सोलापुर - ०.९९

  • एकूण - १९.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT