Shivsena Shinde And Thackeray team Sakal
मुंबई

Shivsena Mumbai: शिंदे - ठाकरे गटात प्रभादेवीत नक्की काय घडलं? तक्रारदार तेलवणेंनी सांगितला घटनाक्रम

गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली, त्यामुळे ठाकरे गट फिका पडला, म्हणूनच आम्हाला मारहाण केल्याचा आरोप तेलवणे यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान काल शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. याचं रुपांतर मारहाणीत झालं, या प्रकरणी आता ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, सरवणकर यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तर शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी घटनाक्रम सांगितला आहे.

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी या मारहाणीचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. तेलवणे याविषयी बोलताना म्हणाले की, काल रात्री माझ्या बिल्डिंगखाली उभा होतो, तेव्हा ठाकरे गटाचे ५० एक लोक आले. मी एकटाच होतो. ते आले आणि मला म्हणाले की, बोल आता काय बोलतोस? पण मीपण या लोकांना पुरून उरलो. त्यांना म्हटलं की तुम्हाला हात लावायचा तर लावा, मला ठार मारा, जिवंत ठेवला तर तुम्हा एकेकाला घरातून उचलून घेईन. मला फक्त उद्धव ठाकरेंचं वाईट वाटतं. आता पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चाललेले शिवसैनिक आहोत. म्हणून आमच्यात हिंमत आहे.

गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली, त्यामुळे ठाकरे गट फिका पडला, म्हणूनच आम्हाला मारहाण केल्याचा आरोप तेलवणे यांनी केला आहे. सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याच्या आरोपावर उत्तर देताना तेलवणे म्हणाले की गोळीबार वाघावर होतो, शेळ्यांवर नाही. पोलीस स्थानकात कुठलाही गोळीबार झालेला नाही. अटक करण्यासाठी आणि प्रकरण वाढवण्यासाठी खोटी बातमी पसरवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT