Eknath Shinde Esakal
मुंबई

Eknath Shinde: ठाण्यातील फेमस मिसळीवर CM शिंदेंनी मारला ताव; मिसळच्या पैशांसोबत कामगारांना दिली दिवाळी भेट

दिवाळीच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंचा मामलेदारच्या मिसळीवर ताव

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दीपावलीच्या निमित्ताने तलाव पालीला फेरफटका मारत थेट ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळ खाण्याचा आंनद लुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील मिसळवर ताव मारला. मिसळ खाल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिसळचे पैसे आणि तेथील कामगारांना दिवाळी भेट देखील दिली.

एकनाथ शिंदेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा, ही दिवाळी सर्वांना सुखी समृद्धी आनंदाची जावो म्हणत शिंदेंनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणेकरांचा जल्लोष ओसंडून वाहतोय. गेल्यावर्षी पण जोर होता. त्यापूर्वी बंद होतं. आपलं सरकार आल्यापासून सगळी बंधनं काढली. दसरा दिवाळी सगळं साजरं करतोय.

आपले सण उत्सव ही परंपरा वाढवायला हवी. ते काम ही तरुणाई करते, धर्मवीर आनंद दिघेंचा हा बालेकिल्ला आहे. सर्वांनी उत्सव पर्यावरणपूरक साजरा करुया आणि संस्कृती कायम ठेवूया असंही पुढे शिंदे म्हणाले.

राजकारण न करण्याचा दिला सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना नेत्यांना देखील सल्ला दिला आहे. राजकारणी लोकांनी सामान्यांची दिवाळी खराब करू नये, असा प्रयत्न केला पाहिजे. राजकारण करायला खुप संधी असते, दिवाळीचा सण सामान्यांच्या आयुष्यात सुखाचा, समृध्दीचा, मांगल्याचा क्षण असतो. त्या आंनदावर विरझण घालू नये, असंही शिंदे यावेळी म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT