मुंबई

वर्षा बंगल्यावर सेनेची खलबतं, आगामी निवडणुकांचं वर्ष डोळ्यासमोर ठेऊन मोर्चेबांधणी

सुमित बागुल

मुंबई : नुकतीच शिवसेनेचे मंत्री आणि जिल्हाप्रमुखांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर आता आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेत्यांची आणि संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडतेय. येणारं वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे, त्यामुळे प्रत्येक गावागावात शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आजची शिवसेनेची बैठक घेतली जातेय, अशी माहिती मिळतेय. या बैठकीत शिवसेनेचे सर्व उपनेते आणि संपर्कप्रमुख उपस्थित आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये लगेचच ग्राम पंचायतींच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. तसेच आगामी काळात मुंबई महापालिकेची देखील निवडणूक आहे तसेच इतरही महापालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्षाकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनिणती आखण्याचं काम सुरु आहे.

म्हणूनच, महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि उपनेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये स्थानिक निवडणुकांसंदर्भात काय बातचीत होते आणि उपनेत्यांना आणि संपर्क प्रमुखांना काय मार्गदर्शन मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

CM uddhav thackeray called meeting of shivsena leaders at varsha bungalow 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT