Uddhav thackeray Sakal
मुंबई

लोकांचा जीव धोक्यात घालायला 'आशीर्वाद' हवाय का?- मुख्यमंत्री

कार्तिक पुजारी

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेवरुन भाजपवर निशाणा साधला. कोरोनाचा धोका समोर असतानाही विरोधकांना यात्रा काढायचा आहेत. जनता जगली, मेली तरी त्यांना राजकारण करायचं आहे. लोकांचा जीव धोक्यात येतोय, तरी सभा सभारंभ करायचे आहेत. जनतेचे आशीर्वाद हवेत असं म्हणतायत, कशाला हवाय आशीर्वाद? लोकांचा जीव धोक्यात घालायला. राजकारण करायला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.(Maharashtra Latest News)

हिंदू सण साजरे करु देण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना विषाणूचा धोका कायम आहे. काहीवेळा कडूपणा घ्यावा लागतो. तो कोण घेणार, तर आम्हाला घ्यावा लागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाण्यात ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटन समारंभात उद्धव ठाकरे बोलत होते.

दहीहंडीचा उत्सव साजरा करता येत नाहीये, याची मला जाणीव आहे. पण, सध्या गर्दी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोना संकट देशावर आहे. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. केंद्र सरकारनेही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी करु नका, असं केंद्राने राज्यांना कळवलं आहे. जे आंदोलन करत आहेत त्यांनी केंद्राचे हे पत्र पाहावे, असंही ठाकरे म्हणाले.

कोरोनामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. आजही परिस्थितीशी आपण झुंजत आहोत. कोरोनाच्या काळात सुद्धा अपघाताचे प्रमाण जास्तच होते. वेगावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. गाडीची यंत्रणा मोजण्यासाठी आपण यंत्रणा गाडीमध्ये लावत आहोत. जनतेच्या माध्यमातून सत्ता मिळत असते. लोकप्रिय मुख्यमंत्री बिरुद लावलं जातं. पण, सोबतचे साथी सोबती जेव्हा काम करतात तेव्हा लोकप्रियता लाभत असते, असं मुख्यमंत्री म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT