मुंबई

संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं 'मोठं' विधान, म्हणालेत...

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येतेय अशी चिन्ह आहेत. मुंबई महापालिकेकडून अनेक कोविड सेंटर्स बंद करण्याची पावलं देखील उचलली जातायत. अशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या मुंबईतील रुग्ण कमी होत असल्याने आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन उठणार कधी ? यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टता दिली आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. त्यामुळे सध्यातरी राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याची घाई करणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन बाबत वक्तव्य केलंय.   

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. राज्यात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेत. दुसरी लाट अधिक भीषण असल्याने त्याला रोखायचे कसं याबाबत तयारी सुरु असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. याआधी जिथे लॉकडाऊन उठवला गेलाय तिथे पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुष्की ओढावलीये. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याची घाई करता येणार नाही. संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याऐवजी टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. 

cm uddhav thackeray on lifting lockdown in the state is not possible at the moment

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT