cm uddhav thackeray  sakal
मुंबई

'समजुतीने वागलो नाही तर धोका अटळ', मुख्यमंत्र्यांची दहीहंडी पथकांसोबत बैठक

'इस्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केलीय'

वैदेही काणेकर

मुंबई: महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या (govinda mandal) प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही (ajit pawar) उपस्थित आहेत. "आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल" असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"आंदोलन (protest) करायचं असेल तर कोरोना विरोधात करा. बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आलाय. इस्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केलीय. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलाय. आपण जर समजुतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

"एकदा हे संकट पूर्णपणे घालवूयात. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. नीती आयोगाने जे सांगितलंय. ते लक्षात घेतलं पाहीजे. गेल्या दिड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवलीय ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाहीये. आपण दुसऱ्या लाटेतून डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळालीय. तिचा वापर आपण थोडं अर्थ चक्र सावरण्यासाठी करूयात. पुन्हा ती काळरात्र नकोय. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल" असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

"तिसरी लाट जगातील अनेक देशांत आलेली आहे. सर्व धर्मियांच्या सणांबाबत महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत निर्णय घेतले. त्याला जनतेनेही सहकार्य केले. जे आता पर्यंत आपण सगळं सांभाळलय, त्यामुळे आपल्याला कठोर भूमीका घ्यावी लागेल. आपण सर्वांनी सहकार्य करावे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT