Chief Minister Uddhav Thackeray 
मुंबई

मुंबईतील गर्दी कायम राहिल्यास निर्बंध वाढवावे लागतील- मुख्यमंत्री

कार्तिक पुजारी

मुंबई- मेट्रो चाचणी, बायपास भूमिपूजनानंतर वेगवेगळ्या विकासकामांचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो चाचणीला हिरवा कंदील दाखवला. यावेळी टर्मिनल १ आणि २ वरील प्रवेश मार्ग प्रकल्पाचेही भूमीपूजन झाले. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदि नेत्यांनी उपस्थिती लावलीये. दुर्गाडी मल्टिपीसिटीज पुस्तकाचं प्रकासन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. एमएमआरडीएच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलं होतं.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात निर्बंध होते, याकाळातही मेट्रो निर्माणाचे काम सुरु होते. मी कार्यक्रमाला येताना रस्त्यावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. लोकांनी गाफील होऊ नये, कारण कोरोना अजून संपलेला नाही. लोक असेच फिरत राहिले तर मुंबईमध्ये सुद्धा निर्बंध अधिक कठोर करावे लागतील. जेव्हा निर्बंध उठतील तेव्हा आयुष्य गतीमान होण्यासाठी विकासकाम सुरु आहेत.

कोरोनाच्या संकटातही विकासकामं सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे धन्यवाद. मुंबई हे आधुनिकेतीची कास धरणारं शहर आहे, पण शहराला प्राचिन वारसा सुद्धा आहे. जंगले आहेत, पण त्यात वन्यजीव सुद्धा आहेत. मिठाग्रह आहे, समुद्र आहे, वनस्पती आहेत, अशा विविधतेने नटलेल्या शहराचं नेतृत्व मी करत आहेत. जे काही चांगलं काम होत आहे, त्यात माझं एकट्याचं कर्तुत्व नाही, हे कर्तुत्व माझ्या सहकाऱ्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आहे. श्रेय कधीही एकट्याचं असू शकत नाही. कॅप्टन एकटा काहीही करु शकत नाही. हे एक सांघिक यश असते, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी रामदास आठवले यांच्याबाबत बोलताना मिश्चिल टिप्पणी केली. आठवले साहेबांनी सांगितलं की, जे काही कमी पडत आहे ते राज्यात आणताहेत. आता गेल्यानंतर आणखी काही आठवलं तर मी त्यांना सांगतो. तसं ते माझ्या शेजारीच राहताता, असं ते म्हणाले. अशी सहकारी माणसं ही सोबत आल्यानंतर विकास हा नक्की होणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

SCROLL FOR NEXT