ashish shelar
ashish shelar sakal media
मुंबई

मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांबाबत घेतलेली बैठक म्हणजे केवळ दिखाऊपणा- आशिष शेलार

मिलिंद तांबे

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी (cm uddhav Thackeray) खड्ड्याबाबतीत (potholes meeting) घेतलेली बैठक म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे, तर मुंबईच्या महापौर (mayor) आता धावाधाव करीत आहेत कारण त्यांना पळता भुई थोडी झालेली आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish shelar) यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या विषयावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली. तर खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांचा "सेल्फी विथ् खड्डे"कार्यक्रम आता कुठे गेला? असा खोचक सवालही त्यांनी केला.

खड्डे या विषयावर बोलताना शेलार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काल केलेले विधान हे भाषणातील वाक्याप्रमाणे आहे. जर मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभरातले रस्ते ज्या विविध एजन्सीच्या अंतर्गत येतात त्या सगळ्या एजन्सीची बैठक घेतली असती तर आम्हाला पटलं असतं. त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या तरी कंत्राटदारावर कारवाई केली असती तर आमचा विश्वास बसला असता खड्डे बुजवण्यासाठी वापरात येणाऱ्या मालाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली असतील तर खरे वाटले असते. त्यामुळे खड्ड्याबाबत जी बैठक झाली तो सेल्फी विथ् खड्डे सारखा दिखाऊपणा होता. केवळ दिखाऊपणा केल्याने जनतेचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत. आता माननीय सुप्रियाताई सुळे कुठे गेल्या? सेल्फी विथ् खड्डे हा त्यांचा कार्यक्रम कुठे गेला? त्यांनीही भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती करतो असेही ते म्हणाले.

मुंबईतील खड्ड्याबाबत ते म्हणाले की, आता महापौरांचा प्रवास म्हणजे त्यांना पळताभुई थोडी झाली आहे, गणपतीपूर्वी पावसाळ्याच्या काळात महापौर महोदयांनी ही पाहणी केली असती तर जनतेला खरे वाटले असते. आता त्यांचा प्रवास आणि धावपळ ही पळताभुई थोडी आहे.आता मुंबईकर नागरिकांची त्रस्त भावना दिसते आहे.. निवडणुका समोर आहेत. म्हणून धावाधाव सुरू आहे.कंत्राटदारांची बिलं काढण्यासाठी, एवढे खड्डे बुजवले, खड्ड्यांचे खोडे आकडे दाखवण्यासाठी, आकडे मोठे दाखवून कंत्राटदाराला मदत करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे.

मुंबईत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च झाले कंत्राटदाराला महामार्ग मिळाला मुंबईकरांच्या रस्त्यांचे "रस्ते" लागले. केवळ या वर्षी प्रत्येक वॉर्डात दोन कोटी असे 48 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी खर्च होणार आहेत. महापालिकेचे पोर्टल सांगते 927 खड्डे आहेत, महापौर म्हणतात 42,000 खड्डे बुजवले, कंत्राटदाराला जास्त पैसे मिळाले पाहिजेत, म्हणून बनवाबनवी सुरु आहे. कंत्राटदाराच्या समर्थनाचे आकडे किंवा त्याच्या समर्थनाच्या भूमिका शिवसेना का घेते आहे? असा सवालही त्यांनी केला.

काल एका तरुणाने खड्ड्यात रांगोळी काढली, त्याच्यावर शिवसेनेकडून हल्ला तर होणार नाही ना? अशी भिती आहे, कारण मागे एका रेडिओ जॉकी ने एक गाणे तयार केले तेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले होते, जर असे पुन्हा या रांगोळी काढणाऱ्या तरुणाच्या बाबतीत कराल तर खबरदार, असा इशारा ही आमदार आशिष शेलार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT