CNG-PNG Price Increases cng price hike of rs 4 and png price-of-rs 3 mumbai mahanagar gas limited mgl esakal
मुंबई

CNG-PNG Price Hike : पुन्हा महागाईचा झटका! सीएनजी, पीएनजीचे दर वाढले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने CNG इंधन दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी 80 प्रति किलो तर 48.50 रुपये होणार आहे. वाढलेले नवीन दर हे आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत. CNG-PNG Price Hike

महानगर गॅस लिमिटेडने यासंबंधी एक पत्रक जारी करत माहीती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे की, देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतींमुळे एमजीए(MGA) च्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी घरगुती LPG सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सिलेंडरची किंमत ही 1 हजार 53 रुपये इतकी झाली आहे. दरम्यान आता सीएनजीच्या किमतीत चार रुपये तर पीएनजीच्या किमतीत तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 29 एप्रिलमध्ये वाढलेले होते. त्यावेळी चार रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT