Uddhav Thackrey Esakal
मुंबई

Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याच्या आवारात आढळला 'कोब्रा' जातीचा विषारी साप

सापाला रेस्कू करून त्याला जंगलात सोडण्यात आले

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री बंगल्याच्या आवारात विषारी जातीचा साप आढळल्याची माहिती समोर आली. यानंतर त्वरीत सर्प मित्रांना बोलवण्यात आले. या सापाला रेस्क्यू करून त्याला जंगलात सोडण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्प मित्रांचे आभार मानले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी कोब्रा जातीचा विषारी नाग सापडला. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कलानगर बांद्रा पूर्व येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरून वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशन संस्थेला फोन आला होता.

फोनवरती त्यांनी मातोश्री बंगल्याच्या आवारात एक नाग फिरत आहे. त्यासाठी आम्हाला सर्पमित्राची मदत हवी आहे, असे सांगण्यात आले.

फोन येताच सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री निवासस्थानी गेले. त्या ठिकाणी हा नाग पाण्याच्या टाकीमागे बसलेला होता. हा 'कोब्रा' या विषारी जातीचा नाग असून त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती. हा साप रेस्क्यू करून त्याची माहिती ठाणे वनविभागाच्या कंट्रोल रूमला देण्यात आली.

त्या हद्दीतील अधिकारी रोशन शिंदे यांना फोन करून ही माहिती कळवली. हा नाग हा पूर्णपणे व्यवस्थित आहे. त्यामुळे त्याला वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT