Coca Cola Sakal
मुंबई

Coca-Cola : कोकाकोला पुनर्वापरातून निम्मे प्लास्टिक पॅकिंग करणार - एन्रिक ॲकेरमन

आपल्या जागतिक वापरातही त्यांनी पॅकिंगचे ९० टक्के साहित्य पुनर्वापरातून मिळवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोकाकोलाने आपल्या शीतपेयांच्या पॅकिंगचे निम्मे साहित्य प्लास्टिकच्या पुनर्वापरातून तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. नुकतेच त्यांनी त्यांच्या किन्ले या पाण्याच्या बाटलीचे प्लास्टिक पुनर्वापरातून निर्माण करण्यास सुरुवात केली.

खाद्यपदार्थ, शीतपेये यांच्या पॅकिंगसाठी अशी पुनर्वापराच्या प्लास्टिक बाटल्यांची निर्मिती करणारी ही पहिलीच कंपनी असल्याचा त्यांचा दावा आहे. कचरामुक्त जग निर्माण करण्याच्या कोकाकोलाच्या ध्येयानुसार त्यांनी २०३० मध्ये जगभरात आपल्या शीतपेयांच्या बाटल्यांपैकी निम्म्या प्लास्टिक बाटल्या पुनर्वापराच्या प्लास्टिकमधून निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याचनुसार त्यांनी भारतातही हे पाऊल उचलले आहे.

आपल्या जागतिक वापरातही त्यांनी पॅकिंगचे ९० टक्के साहित्य पुनर्वापरातून मिळवले आहे. कंपनीतर्फे जगात पंधरा टक्के प्लास्टिक बाटल्या पुनर्वापरातून निर्माण केल्या जातात. या बाटल्या खाद्यान्न दर्जाच्या रिसायकल प्लास्टिकपासून बनवल्या जातात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने तसेच युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीच्या मानकांनुसार हे पुनर्वापराचे प्लास्टिक बनवले जाते.

त्यामुळे या बाटल्यांसाठी नव्या कोऱ्या प्लास्टिकची गरज नसते. या प्रक्रियेमुळे प्रदूषण तसेच प्लास्टिक निर्मिती आणि प्लास्टिकचा कचरा कमी होतो. आता भारतात त्यांच्या किन्ले या एक लिटरच्या पाण्याच्या सर्व बाटल्या खाद्यान्न दर्जाच्या पुनर्वापराच्या प्लास्टिकपासून बनवल्या जातात. फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसारच व त्यांची मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच ही प्रक्रिया होते, असे कोकाकोला इंडिया चे उपाध्यक्ष एन्रिक ॲकेरमन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT