मुंबई

कांजूरमार्ग येथे शीतगृहाची जागा निश्चित! प्रत्येक मुंबईकरांपर्यंत लस पोहचवण्याचा मास्टर प्लॅन

तुषार सोनवणे

मुंबई - कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील कांजूरमार्ग येथे शीतगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईकरांसाठी पुरेसा लसींच्या साठ्याची क्षमता या शीतगृहात करण्यात येणार आहे. या शीतगृहांमध्ये मुंबईच्या साठवणूक क्षमतेनुसार 1 कोटी 20 लाख नागरिकांना कोरोनाची लस देता येणार आहे. बाह्य वातावरणाचा आणि सुर्यप्रकाशाचा लसींवर कोणताही परिणाम होऊ नये शीतगृहात 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमान राखण्यात येणार आहे.

कांजूरमार्ग च्या शीतगृहाचे काम जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. लसीच्या साठवणुकीसाठी एक अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी संकुलातील पाच माळांपैकी तीन माळे हे शीतगृह केंद्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. शीतगृहे हे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठावर चालविण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यास प्रत्येक युनिट साठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.


लस उपलब्ध झाल्यानंतर अंमलबजावणी योग्य तयारीसह आणि पूर्व नियोजनाने करणे आवश्यक आहे. क्षेत्रीय स्तरावरील समिती गठीत करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे. मोहिमेतील सहभागी मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. सर्वात आधी आरोग्यसेवक, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स, नंतर वय वर्षे ५० पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण नियोजित आहे.
    - सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका 

मोहिमेचे पाच टप्पे
-. पहिल्या टप्प्यांत साठवणूक

-. दुसऱ्या टप्प्यात वाहतूक यांचा समावेश आहे.

-. त्यानंतर, तीन टप्प्यांत प्रत्यक्ष लसीकरण होईल.

- लसीकरणासाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

- हे पालिकेचे कर्मचारी असतील.

-  जंबो कोविड केंद्रात लसीकरण करण्याचा विचार आहे.

- पाच व्यक्तिंचे एक, याप्रमाणे ५०० पथके लसीकरणासाठी नेमले जात आहे.

Cold storage space at Kanjurmarg fixed Master plan to deliver vaccine to every Mumbaikar

------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT