मुंबई

कॉमेडियन भारती सिंह ड्रग्स प्रकरणः NCB चे दोन अधिकारी निलंबित

अनिश पाटील

मुंबईः  बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या दोन अधिकाऱ्यांना कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला मदत केल्याच्या संशयावरून निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत आहे.

हे दोन्ही अधिकारी कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश याप्रकरणातही तपास करत होते. निलंबनाबरोबरच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिले आहेत. ड्रग्स प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची तत्काळ सुटका आणि इतर एका आरोपीवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा दावा या अधिकाऱ्यांविरोधात करण्यात आला आहे. 

ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. 22 नोव्हेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर केले असता दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी होताच दोघांनी तत्काळ जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांना जामीन मिळाला.

या जामीनाच्या सुनावणी वेळी सदर प्रकरणाशी संबंधित अधिकारी न्यायालयात हजर झाला नाही. त्यामुळे भारतीच्या जामीन अर्जाला विरोध केला गेला नाही. तसेच, त्यांनी भारतीच्या जामीन अर्जाबाबत एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही कळवले नाही. एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी विशेष एनडीपीएस न्यायालयात केली आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणाचा तपास करणा-या एनसीबीने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याऐवजी चौकशीसाठी एनसीबीच्या ताब्यात सोपवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने मंगळवारी या संदर्भात भारती आणि हर्षला नोटीस पाठवली असून, या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Comedian Bharti Singh case Two Narcotics Control Bureau officials suspended

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

PMP Route : ‘पीएमपी’चे मार्ग, फेऱ्या वाढणार; मार्गांची पुनर्रचना लवकरच

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कायम, तुमच्या जिल्ह्यात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीकविमा; उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर; शेतकऱ्यांना २१०० कोटी मिळण्याची आशा

SCROLL FOR NEXT