common minimum programme of shiv sena congress and ncp in marathi 
मुंबई

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह उद्योगांना चालना; वाचा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम सांगितला. पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उशिरा पोहोचले.

शेतकरी

  • अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे 
  • शेतकऱ्यांसाठी तातडीने कर्जमाफीची घोषणा
  • पिकाचे नुकसान झाल्यानंतर तातडीने भरपाईमिळावी यासाठी पिक विमा पद्धतीत सुधारणा करणे  
  • शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी ठोस पावले उचलणे
  • दुष्काळग्रस्त भागात पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी योग्य ती पावले उचलणे 

बेरोजगारी

  • राज्य सरकारमधील रिक्त पदांची तातडीने भरती करणे 
  • उच्चशिक्षित बेरोजगारांना शिष्यवृत्ती देणे 
  • नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 80 टक्के आरक्षण देण्या संदर्भात कायदा करणे 

महिला

  • राज्यात महिला सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार 
  • आर्थिक दुर्बल घटकातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजना 
  • जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या शहरांमध्ये वर्किंग वुमन होस्टेल उभारणे 
  • अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करणे 
  • राज्यात महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे

शिक्षण

  • राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योग्य पावले उचलणार 
  • कामगारांची मुले आणि आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी शून्य टक्के व्याज दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार 

नगरविकास

  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारणा करणे 
  • महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षत्रातील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधीच तरतूद
  • मुंबईसह राज्यातील इतर शहारांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना 
  • पुनर्वसन योजनेत 300 ऐवजी 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेली घरे देणे 

आरोग्य 

  • राज्यात तालुका पातळीवर एका रुपयात आरोग्य चाचणी करणारी केंद्र उभारणार
  • सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्टिटल सुरू करणार
  • राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा कवच

उद्योग 

  • राज्यात गुंतवणूकवाढीसाठी उद्योजकांना अनेक सुविधा देणे
  • आयटी क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी आयटी धोरणामध्ये आवश्यक सुधारणा करणे 
  • उद्योग परवान्यांचे सुलभीकरण करणारी योजना देणे 

सामाजिक न्याय

  • अनुसूचित, जाती-जमाती, इतर मागास, भटके विमुक्त आदींचे प्रश्न सोडवणार
  • अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक आणि आर्थिक मागासपण दूर करण्यासाठी योजना राबवणार 

इतर विषय

  • ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांमध्ये वाढ करणार
  • अन्न-औषध नियमावलीची पायमल्ली करणाऱ्यांन कडक शासन 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT