संग्रहित 
मुंबई

रायगडमध्ये सामुदायिक नमाज पठणाला बंदी

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना 24 एप्रिलपासून सुरू होत आहे. मात्र सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामुदायिक पद्धतीने नमाज पठण करणे, रोजा इफ्तार करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाच्या मुख्य सचिवांच्या आदेशानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुस्लिम बांधवांना तसे आवाहन केले आहे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी सर्वधर्मीय कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मशिदीतही नियमित सामुदायिक पद्धतीने नमाज पठण करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

रोजा इफ्तार, तरावीहलाही बंदी
सायंकाळी रोजा इफ्तार, रात्रीच्या वेळी मशिदीत तरावीहची सामुदायिक नमाज अदा करता येणार नाही. याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. रमजान महिन्यात कोणत्याही परिस्थितीत नियमित नमाज पठण करण्यासाठी घराच्या, इमारतीच्या छतावर, मोकळ्या मैदानावर एकत्र येऊन नमाज पठण करणे व रोजा इफ्तार करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT