मुंबई

ब्रिज अजून बनलाही नाही तोवर आलेत नावांसाठीचे दोन प्रस्ताव, प्रशासन म्हणतंय...

समीर सुर्वे

मुंबई : घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाला दोन व्यक्तींचे नावे देण्याचा प्रस्ताव समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसकडून महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यता आला आहे. मात्र, या पुलाचे काम अद्याप पुर्ण झालेले नसल्याने नामकरण करता येणार नाही अशा शब्दात पालिका प्रशासनाकडून सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.

स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम अझाद यांचे नाव या उड्डाण पुलाला देण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी 27 नोव्हेंबर 2018 रोजी तत्कालीन महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना पत्र पाठवून केली होती. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी 5 ऑक्‍टोबर रोजी महाडेश्‍वर यांना पत्र पाठवून या पुलाला दिवंगत खासदार गुरुदास कामत यांचे नाव देण्याची मागणी केली होती. ही दोन्ही पत्र महापौर कार्यालयाकडून 29 जानेवारी 2019 रोजी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आले.

गटनेत्यांनी हे दोन्ही नामकरणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठवले होते. या प्रस्तावांवर 4 ऑगस्टच्या गटनेत्यांच्या बैठकीत अभिप्राय सादर करण्यात आला आहे. या अभिप्रायात आतापर्यंत पुलाचे बांधकाम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या नामकरण करणे तांत्रिक दृष्ट्या शक्‍य नाही असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगरपालिका दरवर्षी साधारण दिड ते 2 हजार नामाकरणाचे प्रस्ताव मंजूर करते. रस्ते, चौक, उद्यान, मैदाने यांचे नामकरण झाल्यानंतर नगरसेवकांकडून रुग्णालये, आरोग्य केंद्र, शाळा आणि अग्निशमन केंद्राबरोबरच स्मशानभुमीच्या नामकरणाचीही मागणीही नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र, पालिकेने अग्निशमन केंद्र आणि स्मशानभुमीच्या नामकरणास विरोध केला आहे. तर, आरोग्य केंद्र, रुग्णालये, दवाखाने यांच्या नामकरणाला परवानगी दिली आहे.

( संकलन - सुमित बागुल )

before completion of fly over bridge two request suggesting names received

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT