पुई ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी भिक्षेकरीगृहाच्‍या इमारतीची पडझड झाली आहे. त्‍यामुळे येथे राहणारे भिक्षेकरी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. 
मुंबई

कोलाडमध्‍ये सरकारी भिक्षेकरीगृहाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा

रोहा : कोलाडजवळील पुई ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी भिक्षेकरीगृहाची अवस्था बिकट झाली आहे. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीची पडझड सुरू असून, काही इमारती अर्ध्या कोसळलेल्या आहेत. त्यामुळे येथे राहणारे भिक्षेकरी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई ग्रामपंचायत हद्दीत कुंडलिका नदीच्या तीरावर निसर्गरम्य ठिकाणी महिला व बालविकास खात्यांतर्गत सरकारी भिक्षेकरीगृह आहे. पूर्वी या ठिकाणी कुष्ठरोगी दवाखाना होता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. अजूनही या ठिकाणाला परिसरात लिप्रसी हॉस्पिटल या नावानेच ओळखले जात आहे. नदी तीरावर असल्याने या ठिकाणी वारंवार पुराचे पाणी शिरून इमारती कमजोर होतात; मात्र त्यांच्या देखरेखीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून वापरात नसलेल्या इमारतींची पडझड झाली आहे. कर्मचारी व भिक्षेकरी राहत असलेल्या इमारती जीर्ण आणि धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींची वेळीच दुरुस्ती न केल्यास काही दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भिक्षेकरी व कर्मचारी राहत असलेल्या इमारती कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सरकारी भिक्षेकरीगृहाच्‍या इमारती जीर्ण झाल्या आहेत. काही इमारतींची पडझड झाली आहे. त्यांची डागडुजी किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यास 
पत्र दिले आहे.
- अशोक पाटील, अधीक्षक, सरकारी भिक्षेकरीगृह, पुई, कोलाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT