File Photo 
मुंबई

फेसबुक, ट्विटर, गुगलवरील 'हा' मजकूर हटवा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : समाज माध्यमांवर पोस्ट केल्या जाणाऱ्या बलात्कार व संबंधित वृत्तांमध्ये पीडित महिलांची नावे आणि ओळख न देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्याची अत्यंत आवश्‍यकता असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. फेसबुक, ट्विटर आणि गुगलवरील अशा प्रकारचा मजकूर हटवण्याचीही आवश्‍यकता आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

सामाजिक कार्यकर्ते प्रियांका देवरे आणि नोएल कुरीकोस यांनी केलेल्या फौजदारी जनहित याचिकेवर गुरुवारी न्या. रणजीत मोरे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कायद्यानुसार बलात्कार आणि लैंगिक अत्याचारपीडित व्यक्तीची ओळख न देणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंधनकारक आहे. या निर्देशांची पूर्तता राज्य आणि केंद्र सरकारने करायला हवी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानातील कलम क्र. 228 नुसार पीडितेची ओळख उघड केल्यास गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते.

हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यातील बळी महिलेचे नाव समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले होते. तिचे छायाचित्रही व्हायरल झाले होते, असे याचिकादाराच्या वतीने ऍड्‌. माधवी तवनंडी यांनी सांगितले. याबाबत कठोर निर्देश देण्याची आवश्‍यकता आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. केंद्र सरकारसह संबंधित समाज माध्यमांच्या कंपन्यांना नोटिसा देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होईल.

Confidentiality is required for abused women

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : माता न् तू वैरिणी ! आईनेच एक महिन्याच्या चिमुकलीला तलावात बुडवले अन्...

Latest Marathi News Updates : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Beed Crime: मद्यधुंद चालक-वाहकांनी दामटली बस; बीडजवळ प्रकार उघडकीस, प्रवाशांची घाबरगुंडी, गुन्हा नोंद

Paithan Pandharpur Road: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम रखडले; अवमान याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

SCROLL FOR NEXT