मुंबई

राज ठाकरेंना वाढदिनी आघाडीच्या नेत्यांकडून शुभेच्छा!

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात रान उठविणाऱ्या राज यांचा मनसे आणि काँग्रेस आघाडीतील पक्ष यांच्यात जवळीक वाढलेली दिसून येते आहे.

राज यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्यात सर्वांधिक चर्चा राहिली ती काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांची. लोकसभा निवडणुकीत राज यांनी शिवसेना- भाजप युतीच्या विरोधात जोरदार प्रचारसभा घेतल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडी राज ठाकरेंना सोबत घेण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसमध्येही मनसेला सोबत घेण्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज यांच्या वाढदिवसानिमित्त आज अशोक चव्हाण, शशिकांत शिंदे, राजीव सातव, जितेंद्र आव्हाड, माणिकराव ठाकरे, सत्यजित तांबे, नीलेश राणे, सचिन सावंत यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या. उर्मिला मातोंडकर, रितेश देशमुख यांनी ही ट्‌विटच्या माध्यमातून राज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘लोकप्रिय राजकारणी, उत्तम वक्ते आणि व्यंगचित्रकार असलेल्या मनसे  प्रमुख राज ठाकरे यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!’’ असे शुभेच्छा संदेशांमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीत मनसे प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, मनसेने आघाडीत सामिल न होता मोदींविरोधात स्वतंत्रपणे प्रचार करण्याचे धोरण अवलंबिले होते. 

आगामी विधानसभेलासुद्धा मनसे आघाडीत सामिल होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. दरम्यान, वर्षभरापासून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळीक वाढलेली दिसून  येते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT