भाईंदर ः प्रचारसभेदरम्यान एकत्र आलेले काॅंग्रेसचे नेते.
भाईंदर ः प्रचारसभेदरम्यान एकत्र आलेले काॅंग्रेसचे नेते. 
मुंबई

भाईंदरमध्ये काँग्रेसने फोडला प्रचाराचा नारळ

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर ः भाईंदरच्या आमदाराने शहर लुटून खाल्ले आहे. आता निवडणुकीत त्याला लुटण्याचे काम करा. निवडणुकीत त्याने पैसे दिले, तर ते घ्या, आपला भाव मात्र कमी करू नका, असा सल्ला काँग्रेसचे १४५ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकणार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून शिवसेना-भाजपमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आघाडीचे (काँग्रेसचे) १४५ भाईंदर विधानसभेचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून सर्वांनाच धक्का दिला. या वेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत आता रोज येथील आमदारांची प्रकरणे लोकांपुढे आणणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. 

१४५ भाईंदर विधानसभा आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस लढवत होता; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदा ही जागा काँग्रेसतर्फे मुझफ्फर हुसेन लढवतील, असे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयावर दोन्ही काँग्रेसकडून चार दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झाल्याने मुझफ्फर हुसेन यांनी प्रचाराचा नारळ फोडला. 

या वेळी जनता दलाचे मीलन म्हात्रे, माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळसीदास म्हात्रे, लियो कोळसो, याकूब कुरेशी, महेंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष पेंडुलकर, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किशोर सामंत, काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेश शर्मा, वसई-विरार जिल्हाध्यक्ष ओनील अलमेडा आदी उपस्थित होते. या वेळी निवडणुकीसाठी तयार केलेल्या निवडणूक गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. 

हुसेन म्हणाले, देशात सध्या भ्रष्टाचारालाच शिष्टाचार समजण्याचे दिवस आले आहेत. आताची परिस्थिती यापूर्वी कधीच पहिली नाही. सध्या देशात हिटलरशाही असल्याचा भास होत आहे. विरोध करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. मॉब लीचिंगसारख्या घटना चिंतेत भर घालत आहेत; तर शहरातील परिस्थिती आणखीनच भयानक आहे.
जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी प्रास्ताविक केले; तर कार्याध्यक्ष प्रमोद सामंत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT