मुंबई

राज्यातील काँग्रेसची धुरा बाळासाहेब थोरात यांच्याकडे?

सकाळ न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने नेतृत्व बदलाचे संकेत दिले आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व दिले जाईल, असे समजते. दोन ते तीन दिवसांत नव्या नियुकतीची घोषणा होईल, असे सांगितले जाते. 

काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत आता महाराष्ट्रातील बदलाचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर अशोक चव्हाण यांना बदलण्याची मागणी पक्ष संघटनेतून वाढली होती. शिवाय, राहुल गांधींनी कार्याकारिणी बैठकीत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाण यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी मागील आठवड्यात महाराष्ट्रातील नेत्यांसमवेत घेतलेल्या बैठकीदरम्यानही नेतृत्व बदलाचा मुद्दा पुढे आला होता. 

त्या पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊन नवे प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची चर्चा होऊन त्यात बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. अलीकडेच थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती.

कार्याध्यक्षही नेमणार
लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खिळखिळी झालेली पक्षसंघटना बांधण्याचे आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप - शिवसेना युतीला तोंड देण्याचे आव्हान बाळासाहेब थोरात यांना पेलावे लागणार आहे. यासाठी थोरात यांच्यासोबत कार्याध्यक्ष नेमून प्रदेशनिहाय जबाबदारी सोपविली जाऊ शकते, असाही पर्याय पक्षातून पुढे आल्याचे कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT