congress criticism on bjp petrol diesel prices reduced design sakal
मुंबई

मुंबई : उद्धट दुकानदारही मोदींपेक्षा बरा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्रीरंग बरगे यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आधी पेट्रोलचे भाव भरमसाठ वाढवून नंतर त्यात थोडीशी सूट देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकार पेक्षा उद्धट दुकानदार परवडला. तो निदान एकच भाव कायम ठेवतो, अशी गमतीदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

केंद्र सरकारने नुकतीच करात सवलत देऊन इंधन दरवाढीमुळे होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही केंद्र सरकारची चलाखी आहे. लोकांकडून पैसे उकळणारा एखादा लबाड व्यापारी जसे आपल्या वस्तूंचे भाव आधीच शंभर रुपयांनी वाढवून ठेवतो आणि मग घासाघीस घालून मोठे उपकार करून पन्नास रुपये सवलत दिल्याचे दाखवतो. तसाच हा प्रकार असल्याची टीका बरगे यांनी केली आहे. त्यापेक्षा ग्राहकाने दरात सूट मागितल्यावर,एकच भाव, असे वसकन अंगावर ओरडणारा दुकानदार परवडला. तो निदान एकच भाव कायम ठेवतो आणि अशी चलाखी करत नाही असेही ते म्हणाले.

देशवासीयांनी विश्वासाने भाजपला देश चालवण्यासाठी दिला होता, दुकान चालवण्यासाठी दिले नव्हते, याची जाणीव मोदी यांनी ठेवावी. दुकानदार आणि ग्राहक जसे रास्त किमतीसाठी घासाघीस घालतात तसा प्रकार केंद्र सरकारने करू नये. ही लोकांची धडधडीत फसवणूक आहे. केंद्र सरकारने ही इंधनाचा एकच रास्त भाव निश्‍चित करावा असाही सल्ला बरगे यांनी दिला आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार इंधनाचे दर बदलत असलेले तरीही ते दर कमी ठेवून जनतेला दिलासा देणे केंद्र सरकारला सहज शक्य आहे. केंद्र सरकारच्या हातात प्रचंड अधिकार असल्यामुळे त्यांना जनतेला दिलासा देणे कठीण नाही. मोठी करकपात करून जनतेला स्वस्त इंधन देणे त्यांना सहज शक्य आहे. ते न करता रोज थोडी थोडी इंधन वाढ करून जनतेला रोज फटके द्यायचे आणि एखाद्या दिवशी कर कमी करून जनतेला दिलासा दिल्यासारखे दाखवायचे हे धोरण योग्य नाही. त्याने कोणाचाही फायदा होणार नाही, त्यामुळे पैशाच्या मागे न लागता केंद्र सरकारने जनतेला दिलासा द्यावा. महसूल वाढवण्याचे तसेच खर्च कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. ते वापरून केंद्राने आपल्या तिजोरीत पैसे जमा करावेत. मात्र विनाकारण जनतेवर भार टाकू नये असेही बरगे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT