मुंबई

मोठी बातमी - निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नेते नाराज, बैठकीत चर्चा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसने आज बैठक घेऊन त्याबाबत चर्चा केली. मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते.  

महाविकास आघाडी सरकारला सहा वर्षे झाली असताना कोकणात चक्रीवादळ आणि कोरोना सारख्या भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे. यात काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.

या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना या बैठकीबाबतची माहिती दिली. थोरात म्हणाले, राज्याचे काही प्रश्न घेऊन आम्ही एकत्र बसलो होतो. सरकार म्हणून आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांकडून आमचे काही प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. सरकारमध्ये आम्ही तीन पक्ष सामिल आहोत. निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करणयाचा प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडणार आहोत, असे थोरात म्हणाले.

आजच्या बैठकीत राज्यातील काही विषयावर चर्चा झाली. कोरोना संकट, आणि चक्रीवादळ यावर पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्यात चर्चा झाली. अशी माहिती थोरात यांनी दिली.

congress leaders unhappy over not getting appropriate position in decision making

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT