Bhai Jagtap 
मुंबई

मुंबई काँग्रेस अध्यक्षांविरोधात हायकमांडकडे आमदाराची तक्रार

मुंबई काँग्रेसमध्ये जोरदार गटबाजी

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: मुंबई काँग्रेसमध्ये (Mumbai congress) सर्वकाही आलबेल नसून पक्षांतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. गटबाजीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. एकाबाजूला काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जातोय. पुढच्यावर्षीची मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक पूर्ण ताकतीने लढवण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (bhai jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाकडून विविध आंदोलन सुरु आहेत. (Congress mla zishan siddiqui complaint to highcommand against mumbai congress president bhai jagtap)

पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जोश निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण हे सर्व सुरु असताना मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाजी सुद्धा तितकीच तीव्र होतेय. यापूर्वी सुद्धा गटबाजीमुळे मुंबई काँग्रेसचे नुकसान झाले आहे.

आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांनी ही तक्रार केली आहे. झिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.

माझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप आमदार झीशान सिद्दीकी यांनी पत्रात केला आहे. यासाठी झीशान यांनी काही घटनांचा दाखला दिला आहे. या वादावर काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षांतर्गत विषय आहे. समोरासमोर बसून मार्ग काढला जाईल असे सांगितले आहे. झीशान सिद्दीकी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ते वांद्र्याचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील लसीकरणाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. मतदारसंघातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला पक्षीय राजकारणाचा रंग देऊन डावलले जात असल्याचा त्यांचा आरोप होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT