मुंबई

Loksabha 2019 : दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार ठरेना!

सकाळवृत्तसेवा

धारावी - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने सहा महिने आधीच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. काँग्रेसचा उमेदवारच निश्‍चित नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतील मरगळ दूर झालेली नाही. त्यातच वडाळ्याचे काँग्रेस आमदार नेमके कोणाकडे आहेत, हे कळत नसल्याने पक्षाचे आस्ते कदम सुरू आहे.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रात सध्या निवडणुकीचे वारे हळूहळू तापू लागले आहे. निवडणुकीच्या प्रचारात सध्या युतीने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. विद्यमान खासदार राहुल शेवाळे युतीचे उमेदवार आहेत. मतदारसंघातील शिवसैनिकांची फळी बऱ्यापैकी मजबूत आहे. त्यातच युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हळूहळू कामाला लागतील, अशी अपेक्षा आहे. 

काँग्रेसने उमेदवार घोषित करण्यास खूपच वेळ घेतल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. काँग्रेसकडून भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी मिळू शकते, असे बोलले जात होते. त्यामुळे उमेदवारीबद्दल साशंकता असल्यामुळे काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत थोडी मागे पडल्याचे दिसते. मात्र, उमेदवारी जाहीर होताच एकनाथ गायकवाड कामास लागले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत गायकवाड मोठ्या फरकाने हरल्याने काँग्रेसमध्ये निराशा आली होती, पण लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड व कालिदास कोळंबकर अनुक्रमे धारावी विधानसभा व वडाळा मतदारसंघातून निवडून आल्याने काँग्रेसने तिथे आपली ताकद असल्याचे दाखवून दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने मतदारसंघात डॉ. संजय भोसले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यातच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने या वेळेची लढत बहुरंगी होईल. 

विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी उमेदवारी गृहीत धरून आधीपासूनच निवडणुकीची तयारी चालू केली होती. लोकसभा मतदारसंघात छाप पाडणारे कार्यक्रम घेण्यात काँग्रेस अपयशी ठरली.

काँग्रेसच्या अडचणीत भर
वडाळा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर सध्या कार्यरत नसल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे. त्यातून मार्ग काढत काँग्रेसला लढत द्यावी लागणार आहे. काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजून काय दिशा घेईल यावर त्यांचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या पुढील अडचणी दिसून येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT