Congress Protest Against Mahayuti Government esakal
मुंबई

Kalyan News : 'महायुती'विरोधात काँग्रेसचे कल्याणमध्ये चिखलफेक आंदोलन; राज्यासह मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

महायुती सरकारविरोधात कल्याण येथे काँग्रेस (Congress) पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले.

शर्मिला वाळुंज

यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

डोंबिवली : राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महायुतीचे सरकार (Mahayuti Government) त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे, असा आरोप काँग्रेसने महायुतीवर केला आहे. महायुती सरकारविरोधात कल्याण येथे काँग्रेस (Congress) पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महापुरुषांचा सतत अपमान, जाती-धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ सतत खराब करणे, औद्योगिक विकासाला खिळ, पेपर फुटीचे ग्रहण, एनईईटीचा गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान, बेरोजगारी, शेतकऱ्यांची उपेक्षा, गुन्हेगारीत वाढ, अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचे असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली.

तसेच या प्रश्नी राज्य सरकारचा विरोध म्हणून यावेळी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रवीण साळवे, शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT