devendra fadnavis bharat jodo yatra  
मुंबई

Election Results: फडणवीस प्रचाराला गेले तेथे पक्षाला चांगले यश; भारत जोडो अपयशी ठरल्याचा भाजप नेत्याचा दावा

Chinmay Jagtap

Congress: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची परिस्थिती पाहता राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यांची खोटी आश्वासनेही जनतेने झिडकारली आहेत, अशी टीका भाजप विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे केली. 

चार राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत आज पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. जनता भाजपच्या बाजूने असल्यामुळे या निवडणुकीत प्रचंड यश भाजपला मिळाले. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी आणलेली ‘लाडली बहना’ योजना लोकप्रिय झाली. आता तेथील मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या माध्यमातून या देशातील जनतेचा विश्वास मिळवला. त्यामुळे भाजप भविष्यात काम करू शकेल यावर जनतेने विश्वास व्यक्त केला. ही केवळ लाट नाही तर मोदींचे कर्तृत्व आहे. त्यांच्या कामावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे जे तज्ज्ञ नाकाने कांदे सोलत होते त्यांना उत्तर मिळाले आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. जेथे देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले तेथेही भाजपला चांगले यश मिळाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT