bmc election  sakal
मुंबई

BMC निवडणुकीआधी काँग्रेसची कोर्टात धाव; ५००० कोटी प्रकरणात सेनेला नडणार

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणीचे आदेश मुंबई महापालिकेला द्यावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेलं काँग्रेस आपल्या मित्रपक्षांशी नाराज असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसतच होतं. मात्र आता काँग्रेसची शिवसेनेबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसने शिवसेनेवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. याबद्दल मुंबई काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. (Mumbai congress approached to supreme court against BMC and Shivsena)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ६ STP प्रकल्पांविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. BMC द्वारे प्रदान केलेल्या ६ STP प्रकल्पांच्या अंदाजांचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकेला एक नवीन पुनरावलोकन समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत आणि फक्त 2 वर्षात 5000 कोटींची वाढ झाली आहे त्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे.

तसंच या प्रकल्पांचं पुनरावलोकन होईपर्यंत त्यांनी महापालिकेला निविदा प्रक्रियेवर स्थगिती आणण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देखील मुंबई काँग्रेसने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकारणात मोठी घडामोड! BJP काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? NDA ची ताकद ४२ खासदारांनी वाढली, चार मित्रपक्ष पुन्हा एकत्र!

IND vs NZ 2nd Test : प्रसिद्ध कृष्णा-वॉशिंग्टन सुंदर OUT, दोन मॅच विनर IN! दुसऱ्या कसोटीच्या Playing XI साठी गौतम गंभीर मोठा निर्णय घेणार

PhonePe चा 14 हजार कोटींचा IPO! 1.5 लाख कोटींचं व्हॅल्युएशन, कधी होणार शेअर बाजारात एन्ट्री? गुंतवणुकीसाठी किती पैसे लागणार?

Latest Marathi News Live Update : बोपदेव घाट अपघाताचा आणखी एक CCTV! भरधाव गाडीने विद्यार्थ्यांना चिरडलं

SSC-HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल; नापास होणाऱ्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी बोर्डाची नवी रणनीती, निकाल 100 टक्के लावण्यासाठी काय आहे मास्टरप्लॅन?

SCROLL FOR NEXT