bbc documentary on gujarat riots  sakal
मुंबई

PM Modi : 'बाअदब, बामुलाहिजा, होशियार! शहंशाह मोदी…'; मोदींच्या मुंबई दौऱ्याआधी झाकल्या झोपड्या

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे वेगवेगळ्या विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे. या दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमीत्त रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. तर यासोबतच काही ठिकाणी पांढऱ्या कपड्याने रस्त्यांच्या कडेला असणारी घरे आणि झोपड्या यांना झाकण्यात आलं आहे.

याचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आहे. यामध्ये आज च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर जोरदार हल्लाचढवला आहे.

काँग्रेसने काय म्हटलंय...

"बाअदब, बामुलाहिज़ा, होशियार! बादशाह मोदी मुंबईत येत आहेत, त्यांच्या डोळ्यांना गरीबी दिसू नये म्हणून सोय करण्यात आलीय. दरवेळी प्रमाणे गरीबीला झाकून ठेवण्यात आलं आहे. जेणेकरून बादशाहाचे मन गरीबी पाहून दुःखी होऊ नये.यावळी बादशाहाने मोठं मन दाखवत गुजरातप्रमाणे भींत बांधून घेतली नाहीये" असं खोचक ट्विट केलं आहे.

सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करणार आहेत.

या उदघाटन कार्यक्रमासाठी सीएसएमटी स्थानक सज्ज झाले असून रेल्वेचीही पूर्ण तयारी झाली आहे. आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे.

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.परंतु गुरुवारी शेवटच्या उशिरापर्यंत वंदे भारतमध्ये काही कामे सुरु होते. पंतप्रधान येणार असल्याने या गाडीची मोठी चर्चा आहे.

दोन हजारहुन अधिक फौजफाटा

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झाले असून सीएएमटी रेल्वे स्थानक परिसरात दोन हजारांहून अधिक फोजफाटा तैनात केला होता. यामध्ये मुंबईसह ग्रामीण भागातील पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT