Congress Party esakal
मुंबई

काँग्रेसची 'स्वबळा'साठी मतदारांना साद

ग्रामीण भागात चर्चासत्रे; आमदार, मंत्री फिरणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यभरातील जनतेत जाऊन संघटनेची ताकद वाढवून निवडणुका लढण्याच्या शिवसेनेच्या (shivsena) रणनीतीपाठोपाठ काँग्रेसही (congress) आता पुन्हा गावपातळीवरच्या मतदारांना साद घालणार आहे. त्याआधी वाड्या-वस्त्यांमधील कार्यकर्त्यांची मोट बांधण्याच्या हेतूने मेळावा, बैठका आणि चर्चासत्र भरविण्याचे नियोजन काँग्रेसने (congress) केले आहे.

निवडणुका स्वबळावर लढण्याची हाक दिल्यानंतर संघटनेतील मूळ ‘बळ’ जाणून नवा अजेंडा ठरविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. या मोहिमेसाठी प्रदेशाध्यक्षांसह प्रदेश पातळीवरचे कार्याध्यक्ष, मंत्री, आमदार राज्यभर फिरणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांत स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही जाहीर केली आहे. भाजपचे वर्चस्व असलेले मतदारसंघ वळगता अन्य भागांत आघाडीतील घटक पक्ष समोरासमोर येणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट आहे.

निवडणुकीच्या तयारी भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर प्रमुख नेत्यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतला; त्यानंतर निरनिराळ्या भागांतील कार्यक्रमांना हजेरी लावून नेत्यांनी स्वबळाचा निर्धार केला. मात्र, हा प्रयोग फसणार नाही, यावर गांभीर्याने विचार करीत, काँग्रेस आपली जुनी ‘व्होट बँक’ पुन्हा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातून अगदी वाड्या-वस्त्यांपासून शहरांमधील कार्यकर्त्यांना एकत्र आणून थेट मतदारांपर्यंत पोचण्याचा कार्यक्रम आखण्यात येत आहेत.

काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना उत्तर

केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा कारभार उजेडात आणण्यासाठी राज्यभर दौरे करून लोकांपुढे आता नव्याने काँग्रेसचा पर्याय उभा करणार असल्याचे पटोले यांनी जाहीर केले. पक्षाची ताकद झपाट्याने वाढली आहे. हेच खुपत असलेली मंडळी काँग्रेस पक्ष नेत्यांवर मर्यादा आणून पाहत आहे. तरीही प्रत्येक कार्यकर्ता, सामान्यांपर्यंत पोचून संघटना बांधणी करीत असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

Latest Marathi News Live Update: त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SIT ची स्थापना

Keshav Upadhye : मोदींना हरवले, पण नुकसान महिलांचे; प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT