congress and BJP e sakal
मुंबई

Mumbai News : काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील माजी खासदार मिलिंद देवरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापाठ आता कॉग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसमधील वाँर्ड क्र. ८२ मध्ये दोन वेळा काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदीश कुट्टी अमिन आणि वाँर्ड क्रमांक २१६ चे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड, भालचंद्र शिरसाट, अमरजीत मिश्र आणि माजी नगरसेवक मुरजी पटेल आदी यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत हा प्रवेश झाला.

मुंबई काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. तर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, 'सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे देखो होता है क्या...' असे सूचक वक्तव्य केल्याने विरोधी काँग्रेससह इतर पक्षांचे नेतेही काहीसे सावध झाले आहेत.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होईपर्यंत तरी भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे) या पक्षात सध्या इन कमिंग सुरू राहणार असल्याचे दिसते.

आगामी काळात लोकसभा, विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता देशात, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षात शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण शिवसेना (शिंदे गट), भाजप पक्षात प्रवेश करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्याच्या मंत्रिमंडळात जुने नेते कायम राहू शकत नाही, नवीन चेहरे...; उपमुख्यमंत्र्यांचं सुचक वक्तव्य, असं नेमकं का म्हणाले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT