Loksabha Election
Loksabha Election Esakal
मुंबई

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

विनोद राऊत

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून अजूनही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसमधील नाराजी बघता या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगवण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची माहिती आहे.

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप वेगाने सूत्रे हलवत आहे. दोन टर्म निवडून आलेल्या पूनम महाजन यांना या वेळी तिकीट नाकारण्याचा पक्षाचा विचार आहे. महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार, पराग अळवणी या नावांवर भाजपची चर्चा अडकली आहे; मात्र वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर हे चित्र बदलले आहे.

काँग्रेससाठी तुलनेने सुरक्षित असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी तसेच भाई जगताप, संजय निरुपम हे नेते इच्छुक होते. महत्त्वाचे म्हणजे चारही जण या मतदारसंघाशी संबंधित असून त्यांचे वास्तव्य याच भागात आहे. यापैकी संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे.

दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी आमदार वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. त्यांचा धारावी विधानसभा मतदारसंघ या लोकसभेत मोडतो; मात्र गायकवाड यांनी प्रयत्न करूनही हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला. त्यामुळे नाराज गायकवाड यांनी उत्तर मध्य मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला.

वर्षा गायकवाड यांचा दावा का?

वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे २००४मध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. या मतदारसंघात दलित, अल्पसंख्याक समाजाची संख्या बघता हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार

सुरेश शेट्टी- माजी आरोग्यमंत्री, अंधेरी पूर्व

नसीम खान- काँग्रेसचा मुस्लीम चेहरा, माजी मंत्री

भाई जगताप- मुंबईचे माजी काँग्रेस अध्यक्ष, विधान परिषद आमदार

संजय निरुपम- काँग्रेसकडून हकालपट्टी झालेले माजी खासदार

काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा नसीम खान यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यात आतापर्यंत एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे नाराज असलेल्या नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यात चार वेळा मंत्री व आमदार राहिलेले नसीम खान उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांना तेथूनही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. निवडणुकीत पक्षाने राज्यात तसेच बाहेरील राज्यातही प्रचार करण्याचा आदेश मला दिला होता. त्यासह पक्षाच्या सर्व आदेशांचे मी पालन केले; मात्र राज्यात काँग्रेसने एकाही अल्पसंख्याक व्यक्तीस उमेदवारी का दिली नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्यास माझ्याकडे शब्द नसल्याने मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही, असे नसीन खान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT