job security 
मुंबई

लॉकडाऊनमुळे सरकारी नोकऱ्यांना आला भाव... ते कसे काय जाणून घ्याच 

कृष्ण जोशी

मुंबई : कोरोनाच्या फटक्यामुळे खासगी नोकरदारांची अवस्था बिकट झाल्यामुळे आता नोकरीतील सुरक्षितता (जॉब सिक्युरिटी) हा मुद्दा विचारात घेऊन पुन्हा तरुणांमध्ये सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ झाली आहे. 

गेले काही वर्षे खासगी नोकऱ्यांच्या मोठ्या संधी व चांगले वेतन यामुळे खासगी क्षेत्राला चांगले दिवस होते. इतके दिवस लहान शहरांमधील तरुण चांगल्या खासगी नोकऱ्यांसाठी महानगरांमध्ये जात होते. मात्र आता हा प्रवाह उलटा झाल्याने महानगरांपेक्षा लहान शहरांमधील तरुणांमध्ये सरकारी नोकरीचे आकर्षण वाढले आहे. अड्डा २४७  या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामधून ही बाब दिसून आली आहे. कोरोनाच्या फैलावात सरकारी नोकऱ्यांची स्थिती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. 

कोरोनाच्या व टाळेबंदीच्या तडाख्यामुळे खासगी नोकरदारांना सर्वात जास्त फटका बसला आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांचे पगार घटले आहेत. परिस्थिती न सुधारल्याने बेकारीची टांगती तलवारही आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांच्या मनात जॉब सिक्युरिटी हा मुद्दा ठरला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या साडेसहा हजार उमेदवारांपैकी ८२.३३ टक्के उमेदवारांनी खासगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले. 

छोट्या शहरांमधून ६६ टक्के तरुणांनी सरकारी नोकऱ्यांना प्राधान्य दिले. तर महानगरांमधील ३४ टक्के उमेदवार सरकारी नोकरी करू असे म्हणत आहेत. महानगरांमध्ये अजूनही सरकारी नोकऱ्यांपेक्षा आकर्षक अशा खासगी नोकऱ्यांची संधी असल्याने तेथे जास्त नोकरदारांचा खासगी नोकऱ्यांनाच प्राधान्य आहे. अर्थात वेगवेगळ्या शहरांमध्ये हे प्रमाण कमी जास्त होते. दिल्ली व पाटण्यामध्ये सरकारी नोकरीची मागणी ११ टक्के तर सर्वात कमी चेन्नईमध्ये तीन टक्के होती. पुण्यात हे प्रमाण ४.८० टक्के होते.८२.३३ टक्के लोकांनी जॉब सिक्युरिटीच्या मुद्यावर सरकारी नोकरीला प्राधान्य दिले. तर पाच टक्के तरुणांनी सरकारी नोकरीत मिळणारा पगार व २.७७ टक्के लोकांनी सरकारी नोकरीतील इतर लाभ या कारणामुळे सरकारी नोकरीला पसंती दिली. खासगी क्षेत्रात कधीही नोकरी जाण्याची भीती व सरकारी नोकरीतील सुरक्षितता याचमुळे तरुण पुन्हा सरकारी नोकरीकडे वळू लागले आहेत, असे अड्डा २४७ चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागर म्हणाले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT