Kokan Railway News sakal
मुंबई

Railway News: मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय; या विशेष गाड्या होणार नाहीत बंद!

विशेष ट्रेन सेवा कालावधीत वाढ; प्रवाशांना मिळणार सोयीस्कर सुविधा |Increase in special train service duration; Passengers will get convenient facilities

सकाळ वृत्तसेवा

Railway News: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडूनन विशेष गाड्यांच्या सेवेचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष ,नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष या गाड्यांचा समावेश आहे.विशेष गाड्यांच्या सर्व वाढीव फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह आरक्षण १३ फेब्रुवारी पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ट्रेन क्रमांक 02139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १५.०२.२०२४ पर्यंत चालविण्यात येणार होती. आता ही गाडी ३०.०५.२०२४ (३० फेऱ्या) पर्यंत चालविण्यात येत आहे. ट्रेन क्रमांक 02140 नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १७.०२.२०२४ पर्यंत चालविली जाणार होती परंतु आता ०१.०६.२०२४ (३० फेऱ्या) पर्यंत फेऱ्या वाढविण्यात येत आहे.

ट्रेन क्र. 02144 नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष गाडी १५.०२.२०२४ पर्यंत चालविली जाणार होती, आता ३०.०५.२०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे. ट्रेन क्रमांक 02143 पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष गाडी १६.०२.२०२४ पर्यंत ऐवजी आता ३१.०५.२०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT