Talai Village Sakal
मुंबई

तळई गावातील 63 कुटुंबासाठी घरांची उभारणी येत्या दिवाळी पर्यंत

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळई गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अतिवृष्टीमुळे दरड (Landslide) कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळई गाव (Talai Village) व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे (Home) उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. तळई गावातील 63 कुटुंबियांसाठी (Family) घराची उभारणी येत्या दिवाळीपर्यंत (Diwali) करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्पात आजूबाजूच्या पाड्यातील घरांची उभारणी मार्च 2022 पर्यंत केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

तळई गावातील व आजूबाजूच्या पाड्यातील 261 घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर (म्हाडा) सोपविली आहे. त्या दृष्टीने म्हाडातर्फे नियोजन करण्यात येत असून पुनर्वसन घरांची प्रतिकृती म्हाडामार्फत वांद्रे येथील मुख्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आली आहे. सदनिकांच्या प्रतिकृतीची पाहणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी (ता.24) केली. या प्रसंगी आव्हाड यांनी सांगितले की, हा पुनर्वसन प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तळई गावातील 63 कुटुंबासाठी घरांची उभारणी येत्या दिवाळी पर्यंत केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आजूबाजूच्या पाड्यातील कुटुंबियांसाठी घरांची उभारणी केली जाणार आहे. या घरांची उभारणी मार्च 2022 पर्यंत करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असेल.

रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून व गावातील नागरिकांच्या गरजांचा विचार करून लेआऊट तयार केला जाणार आहे. या लेआऊटमध्ये जनावरे बांधायची जागा, शेतीचे सामान ठेवण्यासाठी जागा आदी बाबींचा  विचार केला जाणार आहे. प्री फॅब तंत्रज्ञानाने या घरांची उभारणी केली जाणार असून गावकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी विचार विनिमय करून घराच्या आराखड्याला अंतिम रूप दिले जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT